Marathi News

चंद्रकांत पाटलांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेवर अजित पवार भडकले, म्हणाले…

पुणे । सध्या राज्यात पदवीधर निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उत्तम दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाश काले, विपरीत बुद्धी म्हणावे लागेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे.

पवारसाहेब हे महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही.

ऐकेकाळी साहेबांबद्दल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्यातील आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: