Marathi News

दुबईच्या राजाच्या पत्नीचे बॉडीगार्डशी संबंध; तोंड बंद ठेवण्यासाठी मोजले कोट्यवधी रुपये

मुंबई | दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन हिचे तिच्या बॉडीगार्डशी प्रेमसंबंध होते. परंतु, ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवण्यासाठी राजकुमारी हया हिने त्यासाठी १२ कोटी मोजले असल्याची माहिती समोर आली आहे. डेली मेलने ब्रिटीश कोर्टाच्या सुनावणीच्या आधारे हा दावा केला आहे.

तसेच २०१६ ते २०१८ दरम्यान राजकुमारी हया हिचे प्रेमसंबंध होते. यानंतर तिचा बॉडीगार्ड राजकुमारी हयासाठी काम करु लागला. ४६ वर्षीय राजकुमारी हया हिचे ब्रिटनच्या ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर याच्यासोबत तब्बल दोन वर्ष संबंध होते.

बॉडीगार्डसोबत असलेले संबंध लपवून ठेवण्यासाठी प्रिन्सेस हयाने अन्य तीन अंगरक्षकांना कोट्यवधी रुपये दिले असल्याची देखील माहिती मिळत आहे. सोबतच राजकुमारी हया तिच्या बॉडीगार्डला खूप महागड्या भेटवस्तू देत असे. यामध्ये १२ लाखांची घड्याळ आणि ५० लाखांची बंदुक यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे.

दरम्यान, दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी राजकुमारी ह्याला न कळविता शरिया कायद्यांतर्गत २०१९ मध्ये घटस्फोट दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार ह्याने दुबई सोडली आहे. आणि बऱ्याच वर्षापासून ती ब्रिटनमध्ये राहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जॅकी श्रॉफच्या फार्म हाऊसमध्ये बंगला, जिम, स्विमिंग पुलसोबतच ‘या’ सुविधा आहेत उपलब्ध
बॉलीवूडच्या ‘या’ कॉमेडीयनच्या आई वडिलांची झाली होती हत्या
…म्हणून शत्रुघ्न सिन्हाने अभिषेक बच्चनच्या लग्नाची मिठाई परत पाठवली होती


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: