Marathi News

दुर्दैवी! स्वप्नपुर्ती झाली पण तो क्षण पाहण्याआधीच वडील गेले हे जग सोडून

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे वडील मोहम्मद गौस यांचे शुक्रवारी निधन झाले. गौस ५३ वर्षांचे होते आणि त्यांना फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले होते. एका गरीब कुटुंबातून आलेला, गौसने आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी सर्व काही पणाला लावले होते.

स्वतःच्या पोटाला चिमटा काढून सिराजला क्रिकेटपटू बनविले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा वेगवान गोलंदाज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहे परंतु त्याचे वडील हे पाहण्यास जिंवत नाही.

ऑटो चालक असूनही, सिराजच्या वडिलांनी त्याला कधीही पैसे कमावू दिले नाहीत, सिराजला सरावासाठी वेळ दिला. आता या क्रिकेटमुळे सिराचे दुर्दैव बघा, तो आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सामील होणार नाही. शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांचा चेहरा त्याला दिसणार नाही.

सिराज हा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघात होता. आयपीएल संपल्यावर भारतीय संघासह तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सिराजला संधी देण्यात आली आहे. पण सध्याच्या घडीला सिराज हा १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये आहे. त्यामुळे त्याला तिथून बाहेर पडता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

मनसेची रणरागिणी कडाडली; अरे नरसाळ्या तुझी विकृती नक्कीच ठेचून काढनार

मुंबई पोलिसांनी पुरावे नष्ट केले; जिया खान आत्मह.त्या प्रकरणी तिच्या आईचे गंभीर आरोप


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: