Marathi News

मनसेची रणरागिणी कडाडली; अरे नरसाळ्या तुझी विकृती नक्कीच ठेचून काढनार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रुपाली पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली असून, धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. आता या धमकीवर रुपाली पाटील यांनी खडसून प्रतिक्रिया दिली आहे.

“अरे भावड्या तुला लाज पण नाही ना एका महिलेला धमकी देतोस, पण सोन्या तू चुकीच्या महिलेला धमकी दिलीस. मी जिजाऊ आईसाहेब, झाशीची राणी लक्ष्मी बाई , मा.सावित्री बाई फुले, मा.आहिल्या बाई होळकर, मा.रमाई माता यांच्या विचारांची लढवय्या लेक आहे” अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.

तसेच पुढे रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर दिला आहे. “धमकी देणाऱ्या नरसाळ्याचा नं-7666398595. तुझी विकृती नक्कीच ठेचुन काढणार.” अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली. तसेच याप्रकरणी पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

एका तरुणाने फोन करून ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. हा फोन शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने अज्ञात नंबरवरुन केला होता.

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच मतदारसंघात प्रचार रंगू लागला आहे. पुण्यातही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, या जागेच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई पोलिसांनी पुरावे नष्ट केले; जिया खान आत्मह.त्या प्रकरणी तिच्या आईचे गंभीर आरोप

“मंदिरांपेक्षा ठाकरे पिता-पुत्रांना बॉलिवूड, पबची चिंता”


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: