Marathi News

रोहित पवारांनी ‘तो’ खतरनाक किस्सा सांगत पवारांवर टिका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची जिरवली

मुंबई | पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विट करत रोहित पवार म्हणतात, ”सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tv वर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा… “अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…” पवार साहेबांबाबत पाटलांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,’ असा टोला त्यांनी मारला.

वाचा काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील…
‘राकारणात येण्यापुर्वी शरद पवार हे मोठे नेते वाटायचे. माञ राजकारणात आल्यानंतर समजले ते खुप छोटे नेते आहेत,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली आहे.

शनिवारी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा अभ्यास करुन मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली असल्याचे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
चित्रपटांमध्ये पोलीसाच्या भुमिकेसाठी नेहमी शफी इनामदारला निवडण्यात यायचे कारण…
सुशांत सिंग राजपूतच नाही तर ‘या’ अभिनेत्यांचे चित्रपट देखील त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले होते
…म्हणून शत्रुघ्न सिन्हाने अभिषेक बच्चनच्या लग्नाची मिठाई परत पाठवली होती


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: