Marathi News

४७८ गुण मिळवत गव्हर्मेंट मेडीकल काॅलेजला लागलाय नंबर पण फी भरायला पैसे नाहीत

बीड । येथील रोहीत भाऊसाहेब निसर्गंध हा मुलगा नीट परीक्षेत ४७८ गुण मिळवून त्याची M.B.B.S साठी ईस्लामपुर येथे निवड झाली आहे. मात्र त्याच्या घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून त्याने शिक्षण घेतले आहे.

त्याची M.B.B.S. प्रथम वर्षास शासकिय प्रथम फेरीत P.I.M.S. Medical College, ईस्लामपुर येथे निवड झाली आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्याला प्रवेश घेण्यास, हॉस्टेलसहीत ३,८२,००० रुपयांची गरज आहे. हे पैसे लवकरात लवकर भरले नाहीत तर त्याची सगळी मेहनत वाया जाणार आहे.

त्याचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे नेत आहेत. मात्र आता ही फी भरणे त्यांना शक्य नाही. म्हणून त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. तरी सन्माननिय, दानशुर व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष यांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपणही त्यांना मदत करू शकतो.

त्याच्या वडिलांनी निवड यांदी देखील जाहीर केली आहे. यामुळे आपण थोडी मदत केली तर तो मुलगा डॉक्टर होऊ शकतो. तो हुशार आहे मात्र परिस्थितीमुळे त्याचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे त्याला मदत करावी.

श्री.भाऊसाहेब दादाराव निसर्गंध
(वडिल)
मो.नं. 7447272054

मदत करण्यासाठी अकाऊंट नंबर देत आहे.
Bank Name: Bank of Maharashtra
Branch : Ambajogai
A/c.No.60158062823
IFSC Code: MAHB0000037


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: