Marathi News

भारतीय संघात निवड न झाल्यामुळे संतापलेल्या सुर्यकुमारने रोहीतसमोर केले मन मोकळे, म्हणाला…

दिल्ली | आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही सुर्यकुमार यादवची निवड भारतीय संघात झाली नाही यामुळे तो नाराज होता. या मौसमात तो प्रचंड फॉर्ममध्ये होता त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी मिळेल असा3 सर्वांनाच वाटत होते पण असे झालेच नाही.

पण त्याच्या पदरी निराशा आली. पण तो खचला नाही आणि त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता रोहित शर्माने याबाबत खुलासा केला आहे.

रोहित शर्माने सुर्यकुमार यादवला काय वाटले? याबाबत सांगितले आहे. आम्ही।टीम रूममध्ये बसलो होतो सुर्या निराश आहे हे मला जाणवत होतं, पण मी त्याच्याजवळ जाऊन बसू शकलो नाही.

काही वेळाने तोच माझ्याजवळ आला आणि म्हणाला काळजी करू नकोस, या निराशेतून मी बाहेर येईल. मुंबईला सामना जिंकून देईल, असे सुर्यकुमार रोहितला म्हणाला. सुर्यकुमार फक्त आयपीएल नाही तर त्याच्या कारकिर्दीत योग्य दिशेने पुढे जात आहे.

त्याची वेळ नक्की येईल, असं रोहित यावेळी म्हणाला आहे. दरम्यान, सुर्यकुमार यादव याने या मोसमात १६ सामन्यात ४८० रन केले आहेत. सुर्यकुमारच्या या कामगीरीमुळे मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय उद्योगपतींना बराक ओबामा यांनी सुनावले खडेबोल, म्हणाले..

मोठी बातमी! कॉमेडियन भारती सिंहला ठोकल्या बेड्या; घरावर NCB ने धाड टाकत ड्रग्ज घेतले ताब्यात


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button
%d bloggers like this: